31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeवेलफेयरदि कल्याण जनता सहकारी बॅकेचे सुवर्ण महोत्सवात 23 डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन...

दि कल्याण जनता सहकारी बॅकेचे सुवर्ण महोत्सवात 23 डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

डोंबिवली  (शंकर जाधव )  

दि कल्याण जनता सहकारी बॅक लि.च्या सुवर्ण महोत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रा.स्व.संघ कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  23 डिसेंबरला सकाळी ११ वाजता कल्याण येथील अत्रे रंगमंदिरात हा सोहळा पार पडणार आहे.
      या पत्रकार परिषदेला बॅके चे सीईओ अतुल खिरवाडकर, अध्यक्ष सचिन आंबेकर, उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवाचे उदघाटन होणार आहे. बॅकेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीमुळे ग्राहक, खातेदार, सभासद यांचा बॅकेवर असलेला दृढ विश्वास दिसत आहे. बॅकेची  गुजरात राज्यातील सुरत येथे नवीन शाखा सुरू केली आहे. आजमितीस बॅकेच्या 43 शाखा असून एकूण व्यवसाय रू. पाच हजार कोटींच्यावर आहे. बॅकेचे सुमारे साठ हजार सभासद असून तीन लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. स्थापनेपासूनच बँक नफ्यात आहे. ग्राहकांना नेट बॅकिंग, मोबाईल बॅकिंग, मिस्ड् कॉल अलर्ट,एसएमएस सुविधा इत्यादी अद्ययावत तांत्रिक सेवा बॅक देत आहे. बॅक दरवर्षी नफ्यातील एक टक्के धर्मादाय निधीसाठी काढून ठेवते व तिचा विनीयोग वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रतील काम करणा:या विविध संस्थांना निधी रूपाने देते. बॅकेने कोरोना काळात कोविड -19 रिलीफ कर्ज योजनेच्या माध्यमातून दिलेल्या कर्जामुळे अनेकांना आपला व्यवसाय सुरळीतपणो चालू ठेवता आला.पन्नास वर्षाच्या कालवधीत बॅकेले अनेक नामवंत संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2013-14 करिता कोकण विभागातील नागरी सहकारी बॅकांच्या गटात महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडून मिळालेला सहकार भूषण पुरस्कार हा बॅकेच्या निस्वार्थी कामास मिळालेली पावतीच आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध योजना सुरू करण्याचा बॅकेचा मानस आहे.

बॅकेने मागील वर्षीच्या दिनदर्शिकेत सायबर क्षेत्रात कसे धोका तयार होतात हे सांगितले आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना नेट बॅकिंग वापरण्यात भिती वाटते अशा वेगवेगळ्य़ा शाखेत असलेल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण शाखा पातळीवर दिले जाणार आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्यांचा वेगपण वाढवू. सायबर सुरक्षा याबाबत बॅक फार गंभीर आहे असेअतुल खिरवाडकर यांनी सांगितले.बॅकेचा 33 टक्के ग्राहक वर्ग हा ज्येष्ठ नागरिक आहे. पन्नास टक्क्यांचा ग्राहक हा 35 ते 55 वर्षार्पयतचा मध्यमवर्गीय आहे. तर 15 ते 20 टक्के हा तरूण वर्ग आहे. कल्याणमध्ये अजून ही बॅकेत जाऊन व्यवहार केले जातात अशी माहिती सचिन आंबेकर यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »