आजकाल, आपण सर्वकाही इंटरनेटद्वारे करतो. आता खरेदीला जाताना पैसे सोबत घेतले नाहीत तरी हरकत नसते. कारण आता UPI पेमेंट अॅप जवळपास प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये आहे. परंतु काहीवेळा तुम्ही पेमेंट करण्यासाठी दुकानात जाता, तेव्हा इंटरनेट नीट काम करत नाही. त्यामुळे तुम्ही पैसे देऊ शकत नाही. ही गोष्ट टाळण्यासाठी आम्ही एक युक्ती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही इंटरनेटशिवाय (UPI Payment Transfer) पेमेंट करू शकता.
पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या तुमच्या UPI अॅप्सद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय पैसे देऊ शकता. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे होऊ शकते. तुम्ही तुमच्या पेमेंट अॅपवरून इंटरनेटशिवाय UPI द्वारे सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकता पण त्यासाठी तुमच्या फोनमध्ये नेटवर्क असणे आवश्यक आहे.
मोबाइल डेटा किंवा इंटरनेटशिवाय पैसे देण्यासाठी, तुम्ही USSD सेवा वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘*99#’ डायल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक पॉप-अप मेनू दिसेल ज्यामध्ये तुम्हाला ‘Send Money’ पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय येतील. जसे कि, UPI आयडी, बँक खाते तपशील आणि मोबाइल नंबर त्यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.
येथून पेमेंट मोड निवडा आणि नंतर आवश्यक तपशील भरा. नंतर तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम भरा. त्यानंतर, तुम्हाला फक्त तुमचा UPI पिन टाकावा लागेल आणि पैसे ट्रान्सफर करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून इंटरनेटशिवाय UPI ट्रान्सफर करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचा फोन नंबर UPI वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.