डोंबिवली ( शंकर जाधव ) बनावट आधारकार्डव्दारे ॲमेझॉन व फ्लीपकार्ट कंपनीस गंडा घातल्याप्रकरणी इंजिनिअर व त्याचे साथीदारांना गजाआड करण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॉबीन अॅन्टनी आरुजा, (२८) रा. पलावा, डोंबिवली पूर्व), किरण अमृत बनसोडे (२६ रा. कल्याण), रॉकी दिनेशकुमार कर्ण (२२ रा. पिसवली), नवीनसिंग राजकुमार सिंग (२२,रा. पिसवली), आणि सिमकार्ड विक्रेता अलोक गुल्ल यादव (२०, रा. डोंबिवली) अशी अटक आरोपींची नावे आहे. गूगलवरून माहिती घेऊन ओळख नसलेल्या लोकांचे आधारकार्ड डाऊनलोड करत मुळ इसमाचा फोटो एडीटर अँपवरुन क्रॉप करुन त्या ठिकाणी आरोपी हे स्वतःचा फोटो लावुन, सिमकार्ड विक्रेत्याकडून आधारकार्डवरून सिमकार्ड खरेदी करायचे. सिमकार्डचे मोबाईल नंबरवरुन ॲमेझॉन व फ्लिपकार्ट या कंपन्यांकडूनऑनलाईन मोबाईल, टॅब, आयपॅड, लॅपटॉप अशा वस्तु ऑर्डर करायचे. कंपनीचा डिलेव्हरी बॉय वस्तू देण्यास आल्यावर त्याच्याकडून सदर वस्तूचा बॉक्स ताब्यात घेवुन त्यास पैसे मोजण्यात गुंतवुन ठेवायचे. तो पैसे मोजत असताना वस्तूचे पॅकींग बॉक्स साथीदार ताब्यात घेवुन त्या बॉक्सला कटरने कापून त्यातील वस्तू काढून त्या ठिकाणी त्या वजनाचा दगड, कपड़ा पॅक करून पैसे कमी असल्याचे कारणावरुन नंतर पैसे देतो असे कारण सांगून वस्तूचा बॉक्स डिलेव्हरी बॉयला परत करुन तो कंपनीस परत पाठवायचे. त्यानंतर मोबाईल व इतर वस्तू कमी किमतीत बाजारात विकायचे.
अटक आरोपींनी गुजरात, कलकत्ता व महाराष्ट्राती पुणे, मुंबई, सातारा, ठाणे, अलिबाग शहरातही गुन्हे केल्याची कबुली पोलिसांकडे केली आहे. आरोपींना कराड, अलिबाग, कासारवडवली पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली होती. गुन्हयात वापरलेले २२ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, १ आयपॅड, १ टॅब तसेच २० सिमकार्ड, २९ बनावट आधारकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी रॉबीन हा एमटेक इंजिनिअर आहे. तर रॉकी हा कॉलसेंटरमध्ये नोकरी करतो. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे, सपोनिरी. सुनिल तारमळे, पोलीस हवालदार प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, पोलीस शिपाई संतोष वायकर, तारांचंद सोनवने यांचे पथकाने केली आहे.