डोंबिवली (शंकर जाधव) १५ ऑगस्ट रोजी भारताचे स्वातंत्र्य अमृत महोत्सवदिनी समाजवादी पार्टी मुंबई विभाग वडाळा पश्चिम (वॉर्ड नं.208) यांच्या वतीने वैभवी बांदकर यांना राज्यस्तरीय प्रतिभावान नारी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा विभागाच्या वतीने २४ जुलै रोजी वैभवी बांदकर यांना पी.सावळाराम राज्यस्तरीयसमाजरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले होते. वैभवी बांदकर या डोंबिवली मधील योग्यं वास्तू या संस्थेच्या संचालिका आहेत. त्या वास्तू विशारद, रेकी ग्रँडमास्टर, क्रिस्टल थेरपीस्ट, टॅरोकार्डरीडर, ज्योतिष तज्ञ,जेमोलॉजिस्ट आहेत. या माध्यमातून त्या गेली १२ वर्षे काम करत आहेत. तसेज गरीब लोकांच्या घरांचे परीक्षण आणि उपाययोजना समाजऋण म्हणून मोफत करीत आहेत. तसेच त्या रेकीचे वर्ग घेतात व रेकीचे सेमिनार देखील मोफत घेतात व विद्यार्थ्यांना दिशा देतात. त्यांच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.