डोबिवली ( शंकर जाधव )
सहकार क्षेत्रातील नामांकित श्री. कुलस्वामी को. ऑ. क्रेडिट सो. लि. या संस्थेच्या सार्वत्रिक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ – २३ / २०२७ – २८ च्या निवडणुकी शिवजन्मभूमी – जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे व नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शंकरशेठ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली “श्री. कुलस्वामी खंडेराय संस्थापक पँनेलने” दणदणीत विजय झाला. सर्व मतदार आणि कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार आवर, लक्ष्मी मार्केट, मुरबाडकर गावठी मार्केट व बेतूरकर पाडा परिसरात “विजयी मिरवणूक” काढण्यात आली. तब्बल ३७ शाखा व १५०० कोटीहून अधिक आर्थिक उलाढाल असलेल्या श्री. कुलस्वामी को. ऑ. क्रेडिट सो. लि. या संस्थेमध्ये प्रथमच संचालक पदी विराजमान झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केल्याचे श्री. कुलस्वामी को. ऑ. क्रेडिट सो. लि.संचालक गणेश पोखरकर यांनी सांगितले.