असुर्डे ( शंकर जाधव ) नुकतेच पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत गाव पॅनलचे उमेदवार पंकज साळवी हे एकूण मतदान १०१९ पैकी ७०२ मते मिळून विजयी झाले. असुर्डे नवनिर्वाचित सरपंच पंकज साळवी यांनी या विजयात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, कॉंग्रेस अशा सर्व पक्षाचा सहभाग असल्याचे सांगितले.
असुर्डे गाव सरपंचच्या निवडणुकीत गावविकास पॅनल कडून पंकज साळवी निवडणूक लढवत होते. गावाने ग्राम पंचायत सदस्य बिनविरोध निवडून दिले. सरपंचपदासाठी एकमत न झाल्याने निवडणूक घेण्यात आली होती. मोठ्या मताधिक्याने विजय झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी सरपंच पदावर दावा केला होता. मात्र हा दावा साळवी यांनी खोडून काढला. अनेक वर्ष शिवसेनेत काम केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विभागप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. जरी शिवसेनेचा विभागप्रमुख असलो तरी सरपंच म्हणून गाव विकास पॅनलाचा असल्याचे साळवी यांनी संगितले आपल्या विजयात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, कॉंग्रेस अशा सर्व पक्षाचा सहभाग आहे. राजकारण विरहीत निवडणूक आम्ही घेतली आहे वास्तविक संपूर्ण निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. मात्र सरपंच पदावर एकमत झाले नाही, बहुतांश गावे माझ्याबरोबर आहे हे मताधिक्यातून दिसून येते. आपण सरपंच एका पक्षाचे नाही, शिवसेना विभागप्रमुख असलो तरी सुद्धा माझे सरपंचपद हे गावविकास पॅनेलचे असल्याचे साळवी यांनी सांगितले.