31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुबईहून थेट वृंदावनात पोहोचले, त्यांचा हा फोटो...

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुबईहून थेट वृंदावनात पोहोचले, त्यांचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल

दुबईमध्ये (Dubai) नवीन वर्षा चे सेलिब्रेशन केल्यानंतर क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बुधवारी वृंदावनला पोहोचले. त्यावेळी या जोडप्याने बाबा नीम करोली यांच्या आश्रमाला भेट दिली. यानंतर विराट व अनुष्का प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांच्या आश्रमात पोहोचले. या दरम्यान त्यांची मुलगी वामिका कोहलीही दिसली. आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्याची आवड असलेल्या या जोडप्याने मथुरा-वृंदावन भेट मीडियापासून दूर ठेवली. पण, विराट-अनुष्का आश्रमात आल्याचे बरेच फोटो, व्हिडीओ सध्या सोशाल मीडियावर फुफान व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये काय आहे

विराट कोहली, अनुष्का शर्मा ४ जानेवारी २०२२ रोजी वृंदावन मधील एका आश्रमात गेले होते. हे जोडपे श्री हित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांना भेटण्याकरिता आले होते. सध्या सोशाल मीडियावर फुफान व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, अनुष्का, विराट जमिनीवर बसलेले दिसत आहेत व त्यांची मुलगी वामिका आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. फोटोमध्ये विराट-अनुष्का हात जोडून महाराजांना नमस्कार करताना दिसत आहेत.

राज्य महिला आयोगावर दुटप्पीपणाचा आरोप करत वाघ यांचा घणाघात ; उर्फीला दिला सज्जड दम

या स्टार कपलने त्यांचा दौरा या ठिकाणी केला

विराट, अनुष्का व त्यांची मुलगी वामिकाने नोव्हेंबर 2022 मध्ये नैनिताल, उत्तराखंडला भेट दिली होती. यावेळी त्यांनी तेथील प्रसिद्ध मंदिरांना देखील भेट दिली होती. यावेळी त्यांनी कैची धाम मंदिराला भेट दिली. त्यानंतर दोघे बाबा नीम करोली यांच्या आश्रमामध्ये दर्शनाकरिता पोहोचले होते. या दौऱ्यावर या स्टार कपलने चाहत्यांसोबत अनेक फोटो क्लिक केले होते. अनुष्काच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का लवकरच स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी (jhulan goswami) यांच्या जीवनावर आधारित आहे. अनुष्काने या चित्रपटाचे शूटिंग आधीच पूर्ण केले असून ते नेटफ्लिक्सवर डायरेक्ट-टू-ओटीटी रिलीज होणार आहे.

रामदास पठार येथे जलजीवन योजनेंतर्गत नळयोजनेचा होणार शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »