डोंबिवली ( शंकर जाधव ) पालिका प्रशासन आपले काम करत असताना आडकाठी येण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त घेतात. अनधिकृत बांधकाम करताना तर अनेक वेळेला पालिकेने पोलीस बंदोबस्त मागविला होता. डोंबिवलीत
पाण्याचे राजकारण` होत असल्याने चक्क पाण्याची लाईन जोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावी अशी मागणी प्रशासनाला करावी लागली. मनसे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगसेवक प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नाने पाण्याची लाईन टाकण्यात आली होती.
पाणी मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे.यासाठी लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्था करदात्या नागरिकांना पाणी देण्याचे काम करते.मात्र पाण्याचे राजकारण
हे नागरिकांच्या डोक्याला त्रास झाला आहे.मनसे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.टाळेबंदी आधी पाण्याची लाईन टाकण्यात आली होती.फक्त लाईन जोडण्याचे काम पूर्ण होणे बाकी होते. डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली जलकुंभ,काळूनगर जलकुंभ, ठाकुर्ली दोन जलकुंभ या चार जलकुंभाचे झोनिंगचे काम सुरु आहे.या कामामुळे देवीचा पाडा,उमेशनगर, काळूनगर, जुनी डोंबिवली गाव, ठाकूरवाडी, तेलकोसवाडी,विजयनगर, सह्याद्रीनगर या भागातील पाणी समस्या दूर होतील.या कामांतर्गत सत्यवान चौक ते नवीन देवीचा पाडा स्मशानभूमी पर्यत २०० मी.मी.व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही जलवाहिनी सत्यवान चौक मधील ४०० मी.मी.व्यासाच्या जलकुंभावरून थेट आलेल्या मुख्य जलवाहिनीस जोडण्याचे काम बाकी आहे.मात्र या कामा काहीजन आडकाठी आणत येत आहे.या कामासाठी लवकरात लवकर पोलीस बंदोबस्त द्यावा अश्या मागणीचे पत्र पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याला दिले आहे. दरम्यान याचे गांभीर्यलक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल का हे लवकरच दिसेल.