29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यासाठी घरच्यांना न सांगता गेले आणि...

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यासाठी घरच्यांना न सांगता गेले आणि…

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यासाठी घरच्यांना न सांगता गेलेल्या एका प्रेमीयुगुलाचा गोव्यातील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे प्रेमीयुगुल मूळचे उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. ही घटना दक्षिण गोव्यातील पालोलेम समुद्रकिनाऱ्यावर घडली.
प्रेमीयुगुल बुडत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जीवरक्षकांच्या मदतीने दोघांनाही किनाऱ्यावर आणण्यात आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह पाठविण्यात आले. मृत मुलीचे नाव सुप्रिया दुबे (२६) आणि मुलाचे नवा विभू शर्मा (२७) असल्याचे कळते.
हे प्रेमीयुगुल मूळचे उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. व्हॅलेंटाईन्स डे च्या आधीच ते गोव्यात आले होते. मृत सुप्रिया दुबे सध्या बंगळुरू येथे राहत होती, तर विभू शर्मा हा मुंबईत राहत होता. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते. सोमवारी रात्री काही पर्यटकांनी त्या दोघांनाही समुद्रकिनारी फिरताना पाहिले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर कळले की, दोघांच्याही घरातल्यांना ते गोव्याला जात असल्याचे माहीत नव्हते.
पालोलेम बीचवर रात्रीचे जेवण आणि कॉकटेल घेतल्यानंतर ते दोघे समुद्रात पोहायला गेले होते. पोलिसांना दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचे आव्हान होते. मात्र, मुलीचा मोबाईल समुद्रकिनारी आढळून आला. तिच्या बोटांच्या ठश्यांनी मोबाईलचे लॉक उघडल्यानंतर मृत मुलीची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आले. ते दोघे गोव्यातील व्हिसिनीटी रिसॉर्टवर थांबले होते. विभू शर्मा हा कवी होता, तसेच तो ब्लॉगिंगही करायचा. सोशल मीडियावर त्याच्या कवितांचे व्हिडीओ देखील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »