डोंबिवली (शंकर जाधव)
डोंबिवलीत रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविले जाते असे सर्व नागरिकांना माहीत आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली येथे रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू असताना अचानक ट्रकचे मागील चाक रुतले. रस्त्याचा काही भाग खचल्याने हा प्रकार घडल्याने नागरिक आश्चर्य चकित झाले होते.येथील शिवसैनिक अभिजित बनसोडे यांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करत ट्रकचे चाक बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविली. काही वेळाने क्रेनच्या सहाय्याने ट्रकचे मागील चाक बाहेर काढण्यात आले. काही दिवसांपूर्वी सुयोग मंगल कार्यालयासोरील रस्त्यात कचरा वाहू डंपरचे चाक अश्याप्रकारे अडकले होते. तर डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील रस्त्यात ड्रेनेजवरील झाकण तुटून त्यात ट्रकचे चाक रुतले होते.