करण जोहर (Karan Johar) बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन होस्ट करणार नाही, पण आता होस्ट म्हणून अनेक नावे समोर आली आहेत. या नावांपैकी रणवीर सिंगचे नाव खूप गाजले. पण आता रणवीर बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT 2) शो होस्ट करणार नसल्याचे समोर आले आहे. ‘रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. या खास चित्रपटांची रणवीर लवकरच घोषणा करेल’ असे सूत्रांनी एका वृत्ताला सांगितले.
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोची लोकप्रियता पाहता बिग बॉस ओटीटी व्हर्जन गेल्या वर्षी सुरु करण्यात आला होता. बिग बॉस ओटीटी शोचेही अनेक कारणांमुळे खूप कौतुक झाले. आता पुन्हा एकदा बिग बॉस ओटीटी चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मात्र, या सीझनमध्ये करण जोहर होस्टच्या भूमिकेत दिसणार नाही. त्यामुळे आता नवीन होस्ट कोण असेल यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.
बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनसाठी अनेक नावं चर्चेत आहेत. शोच्या निर्मात्यांनी सेलिब्रिटींना विचारण्यास सुरुवात केली आहे. या सीझनमध्ये कांची सिंग, पूजा गौर आणि महेश शेट्टी यांची नावे चर्चेत आली आहेत. याशिवाय शोच्या निर्मात्यांनी पूनम पांडे आणि भावना सेठ यांनाही शोसाठी विचारले आहे. मात्र पूनम आणि सभावन या चर्चेवर अजूनही मौन बाळगून आहेत.
दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटी ची पहिल्या सीझन ची विजेती होती तर निशांत भट्ट उपविजेता ठरला.