डोंबिवली ( शंकर जाधव ) :- सर्व शासकीय बाबीपूर्ण करून घर विकत घेतले, पण जागा मालकाने मनमानी करत इमारतीच्या पार्किंगमध्ये गाळा बांधला.डोंबिवली पूर्वेकडील विठ्ठल प्लाझा या इमारतीतील संतापलेल्या महिलांनी हातोडा, फावडे घेऊन येथील गाळा तोडला. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनी या महिलांना सहकार्य केले.राणे म्हणाल्या, महिलांनी ठरवलं तर त्या वेळेप्रसंगी अन्याय विरोधात लढा देऊ शकतात.या इमारतीत हा अनधिकृत गाळा तोडण्यासाठी महिलांनी जागामालकाला संगीतले होते.मात्र जागामालक ऐकत नसल्याने महिलांनी हे पाऊल उचलले.