भारतीय महिला क्रिकेटची (Indian Women Cricket) दिग्गज आणि अनुभवी खेळाडू मिताली राजने (Mithali Raj) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. मितालीने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली. मिताली 39 एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले आहे.
Thank you for all your love & support over the years!
— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u
“इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे ही सन्मानाची गोष्ट होती. मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत झाली. “मी भारतीय महिला क्रिकेटच्या वाढीसाठी योगदान देऊ शकले,” मितालीने तिच्या निवृत्ती नोटमध्ये म्हटले आहे. तिने सर्व संघसहकारी, बीसीसीआय, बीसीसीआयचे (BCCI) सर्व पदाधिकारी आणि सर्व चाहत्यांचे आभार मानले.
नुकत्याच जाहीर झालेल्या ICC महिला एकदिवसीय क्रमवारीत ती सातव्या स्थानावर होती. यंदाच्या महिला विश्वचषकातही (Women Worldcup) मिताली राजने भारताचे (India) नेतृत्व केले. मितालीने आतापर्यंत सहा वर्ल्डकपमध्ये भाग घेतला आहे. महिला क्रिकेटमध्ये तिच्या नावावर अनेक विक्रम झाले आहेत. मिताली राज गेली 23 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) खेळत होती.